सांगलीत रुग्णवाहिकेची तोडफोड करत एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:27 IST2021-03-05T04:27:24+5:302021-03-05T04:27:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चौकात पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण करत रुग्णवाहिकेची तोडफोड करत पानपट्टीचेही नुकसान करण्यात ...

One was beaten while vandalizing an ambulance in Sangli | सांगलीत रुग्णवाहिकेची तोडफोड करत एकास मारहाण

सांगलीत रुग्णवाहिकेची तोडफोड करत एकास मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील सिव्हिल हॉस्पिटल चौकात पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण करत रुग्णवाहिकेची तोडफोड करत पानपट्टीचेही नुकसान करण्यात आले. दोघांनी केलेल्या मारहाणीत वैभव रमेश शिंदे (वय २७, रा. अप्पासाहेब पाटीलनगर, सांगली) हा जखमी झाला. दादासाहेब अशोक कांबळे, विनायक दिलीप यादव (अप्पासाहेब पाटीलनगर, सांगली) अशी संशयितांची नावे असून, कांबळे याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सिव्हिल हॉस्पिटल चौक परिसरात "व्हिआरएस या नावाने पानपट्टी आणि रुग्णवाहिका आहे. गुरुवारी संशयित दादासाहेब कांबळे आणि वैभव शिंदे याच्यात जुन्या कारणावरून वादावादी झाली. वाद वाढत गेल्यानंतर संशयितांनी रुग्णवाहिकेवर कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करत तोडफोड केली. यात रुग्णवाहिकेच्या काचेचे नुकसान झाले. त्यांनी पान दुकानातही तोडफोड केली.

सकाळच्यावेळी या परिसरात गर्दी असताना हा प्रकार घडला. दरम्यान, रात्री उशिरा कांबळे या संशयितास अटक करण्यात आली, तर अन्य अद्याप पसार आहे.

Web Title: One was beaten while vandalizing an ambulance in Sangli