तडवळेतील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:01+5:302021-05-29T04:21:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथील जयकर शामराव शेवडे (वय ५२) दि.२६ रोजी बेपत्ता झाले होते. ...

तडवळेतील एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथील जयकर शामराव शेवडे (वय ५२) दि.२६ रोजी बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह शुक्रवार, दि.२८ रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान मोरणा धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला आहे.
बुधवारी सकाळी शेवडे घरातून शेतातील जनावरांचे शेण काढण्यासाठी व मोरणा नदीवर अंघोळ करण्याकरिता बाहेर पडले होते. मात्र, ते परत घरी आले नाहीत. त्यांचा शोध घेत असताना गुरुवार रोजी त्यांचा टॉवेल व चप्पल मोरणा धरणाच्या पाण्याजवळ आढळून आली. शुक्रवारी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. धरणातील विहिरीतील पाइपमध्ये पाय अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेचा तपास हवालदार कालिदास गावडे करीत आहेत. शेवडे यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी, असा परिवार आहे.
===Photopath===
280521\img-20210528-wa0052.jpg
===Caption===
जयकर शेवडे फोटो