पत्नीस जाब विचारल्याने एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST2021-02-20T05:15:02+5:302021-02-20T05:15:02+5:30

------------------------- अवैध दारू विक्रेत्यास अटक मिरज : भोसे (ता. मिरज) येथे देशी दारू विक्री करणाऱ्या अमोल दिलीप मलमे ...

One of them beat his wife for asking for an answer | पत्नीस जाब विचारल्याने एकास मारहाण

पत्नीस जाब विचारल्याने एकास मारहाण

-------------------------

अवैध दारू विक्रेत्यास अटक

मिरज : भोसे (ता. मिरज) येथे देशी दारू विक्री करणाऱ्या अमोल दिलीप मलमे (रा. भोसे ) यास मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली. मलमे याच्याकडून ६७० रुपये किमतीच्या ११ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. मलमे हा भोसे येथे रामोशीवाडा परिसरात देशी दारू विक्री करताना पोलिसांनी त्याला अटक केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

-----------------------

रसूलवाडीत दुचाकी चोरी

मिरज : रसूलवाडी (ता. मिरज) येथून राजकुमार विजय शिंदे यांची पाच हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली. याबाबत शिंदे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार केली आहे.

---------------------------

मटका घेणार्‍यास अटक

मिरज : मिरजेतील मुजावर गल्लीत मटका घेणाऱ्या शमशोद्दीन नबीसाब शरीकमसलत यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे जाहित्य जप्त करण्यात आले. मुजावर गल्लीत पोलिसांनी छापा टाकल्यानंतर शरीकमसलत हा मटका घेताना सापडल्याने त्यास अटक करण्यात आली . याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद आहे.

Web Title: One of them beat his wife for asking for an answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.