हणमंतवडियेत एकास चाकूने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST2021-09-19T04:27:13+5:302021-09-19T04:27:13+5:30

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अभिजित हा त्यांच्या पृथ्वीसंग्राम दूध डेअरी व डोगराई मिल्क शॉपी या दुकानात काम करीत होते. ...

One stabbed to death in Hanmantwadi | हणमंतवडियेत एकास चाकूने मारहाण

हणमंतवडियेत एकास चाकूने मारहाण

शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अभिजित हा त्यांच्या पृथ्वीसंग्राम दूध डेअरी व डोगराई मिल्क शॉपी या दुकानात काम करीत होते. यावेळी राम म्हस्के हा दारूच्या नशेत तेथे आला आणि त्याने बासुंदी मागितली. यावेळी अभिजित यांनी बासुंदी संपली आहे असे सांगितले. यावेळी राम याने अभिजित याची कॉलर पकडून मारहाण केली व गळ्यातील चेन तोडून घेतली. यानंतर आरोपी राम हा टेबलाचे ड्राॅवर उघडून त्यातील २५ हजार रुपये काढून घेत होता. यावेळी अभिजितने विरोध केला असता आरोपी राम याने त्याच्या पँटच्या खिशातील चाकू काढून अभिजित यास मारून जखमी केले, असे अभिजित याने फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.

Web Title: One stabbed to death in Hanmantwadi