अलकुडमध्ये एकास सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:42+5:302021-02-09T04:29:42+5:30

सांगली : अलकुड (ता. कवठेमहांकाळ) येथे एकास सर्पदंश झाला. अशोक अंबान्ना मडीवाल (वय ३९, अथणी) असे जखमी तरुणाचे नाव ...

One snake bite in Alkud | अलकुडमध्ये एकास सर्पदंश

अलकुडमध्ये एकास सर्पदंश

सांगली : अलकुड (ता. कवठेमहांकाळ) येथे एकास सर्पदंश झाला. अशोक अंबान्ना मडीवाल (वय ३९, अथणी) असे जखमी तरुणाचे नाव असून सोमवारी दुपारी २ वा.च्या सुमारास ही घटना झाली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

---------------------------------------

अपघातात एक जण जखमी

सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात तरुण जखमी झाला. नारायण दादासाहेब करकोळ (वय ३८, हेर्ले, ता. हातकणंगले) असे जखमीचे नाव असून सोमवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

----------------------------------

अपघातात एक जण जखमी

सांगली : दूधगाव-बागणी रस्त्यावर दुचाकीवरून पडून तरुण जखमी झाला. प्रथमेश गजानन एडके (वय २१) असे त्याचे नाव असून सोमवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

--------------------------

इंदिरानगर येथील तरुणास मारहाण

सांगली : शहरातील इंदिरानगर येथे तरुणास मारहाण करण्यात आली. परशुराम शिवलिंग हादीमणी (वय २८) असे त्याचे नाव असून रविवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

------------------------

दुचाकीवरून पडून तरुण जखमी

सांगली : विटा येथील तरुण दुचाकीवरून पडल्याने जखमी झाला. प्रीतम दीपक जाधव (वय २८, असे त्याचे नाव आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: One snake bite in Alkud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.