विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:59+5:302021-03-04T04:49:59+5:30

जत : जत तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पुकार आवटी (वय ४२, रा. कुणिकोणूर, ता. जत) ...

One offense in a molestation case | विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

जत : जत तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून पुकार आवटी (वय ४२, रा. कुणिकोणूर, ता. जत) याच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेचा पती व पुकार आवटी हे दोघे परिचयाचे आहेत. यावरून तो सतत त्यांच्या घरी ये-जा करत होता. मोबाईल सोशल मीडियाद्वारे तो तिला सतत अश्लील मेसेज पाठवत होता. पीडित महिलेचे पती परराज्यात नोकरीसाठी आहेत. ही घटना पीडित महिलेने तिच्या पतीला सांगितली होती. त्यानंतर पतीने त्याला समज दिली होती. दोन दिवसांपूर्वी पीडित महिलेच्या घरी जाऊन अश्लील हावभाव करून व्हाॅट्स-ॲपवरून चॅटिंग करत तिचा त्याने विनयभंग केला होता. यानंतर महिलेने पुकार आवटी याच्याविरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: One offense in a molestation case