वर्गणी मागण्यावरून करगणीत एकाचा खून
By Admin | Updated: May 10, 2014 23:45 IST2014-05-10T23:45:26+5:302014-05-10T23:45:26+5:30
आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी वर्गणी मागण्याच्या कारणावरून तरुणाचा डोक्याला

वर्गणी मागण्यावरून करगणीत एकाचा खून
आटपाडी : करगणी (ता. आटपाडी) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी वर्गणी मागण्याच्या कारणावरून तरुणाचा डोक्याला जोरदार टक्कर देऊन खून करण्यात आला. परसिद्ध रेवण कांबळे (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव असून, महेश आसुपती कांबळे (२५, रा. करगणी) याने परसिद्धच्या डोक्यास जोराची धडक दिली होती. काल (शुक्रवारी) रात्री ही घटना घडली. पोलिसांनी महेश कांबळे याला अटक केली आहे. करगणीत महिन्याभरापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम सुरू आहेत. शेटफळे-कोळे गावास जाणार्या रस्त्याच्या चौकात काल रात्री साडेनऊच्या सुमारास महेश कांबळे याने परसिद्ध कांबळे याच्याकडे जयंतीच्या कार्यक्रमासाठी एक हजार रुपये वर्गणी मागितली. एवढी वर्गणी देण्यास त्याने नकार देताच महेशने शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे दोघांत वादावादी सुरू झाली. तू ताडी का पितोस, दुचाकी का विकलीस, असा जाब विचारत महेशने परसिद्धच्या डोक्यात डोक्याने जोरात धडक दिली. ही टक्कर एवढी जोरात होती की, त्यामुळे परसिद्ध जागेवरच बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)