सांगलीत मोटारीची काच फोडून एक लाखाचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:27+5:302021-08-14T04:32:27+5:30
सांगली : शहरातील काँग्रेस भवनसमोर असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानासमोर उभ्या असलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी ...

सांगलीत मोटारीची काच फोडून एक लाखाचे दागिने लंपास
सांगली : शहरातील काँग्रेस भवनसमोर असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानासमोर उभ्या असलेल्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी एक लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी यजुवेंद्र उदयसिंग गायकवाड (वय ४३ रा. न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी काच फोडून आतील पर्स लांबविली. त्यात सोन्याच्या चार जोडाव्या, नाकातील नथ, दोन मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या असा ऐवज होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी यजुवेंद्र यांच्या पत्नी माहेरी विजयपूरला गेल्या होत्या. बुधवारी त्या खासगी वाहनाने सांगलीत येणार होत्या. त्यांना कोल्हापूरला घेऊन जाण्यासाठी ते सांगलीत आले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कॉंग्रेस भवनजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणास जाण्यासाठी सीईओ यांच्या निवासस्थानासमोर मोटार (क्र. एमएच ०९ एफक्यू ९७१७) लावली. जेवण करून ते परत आले असता, त्यांना मोटारीची डाव्या बाजूची काच फुटल्याचे दिसून आले. त्यांनी मोटारीत पर्स पाहिली असता, ती मिळून आली नाही. त्यानंतर यजुवेंद्र यांनी तातडीने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली.
चौकट
दागिन्यावर डल्ला
चोरट्यांनी पाळत ठेवून पती-पत्नी मोटारीतून हॉटेलमध्ये गेल्याचे पाहूनच हा प्रकार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चोरट्यांनी २५०० रुपये किमतीची सोन्याची जोडवी ४ नग, १० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, २ हजारांची सोन्याची नथ, एक तोळ्याचे मणी मंगळसूत्र, दीड तोळ्याचे सोन्याची मणी मंगळसूत्र, ४० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या असा एकूण १ लाख ५ हजारांचा ऐवज लांबविला.