बुधगावमध्ये क्रेडिट कार्ड वापरून एकास लाखाला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:28 IST2021-05-20T04:28:09+5:302021-05-20T04:28:09+5:30

सांगली : बुधगाव (ता.मिरज) येथील एका वृद्धाच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून त्यास एक लाख ३ हजार ७०१ रुपयास गंडा ...

One lakh gang using credit card in Budhgaon | बुधगावमध्ये क्रेडिट कार्ड वापरून एकास लाखाला गंडा

बुधगावमध्ये क्रेडिट कार्ड वापरून एकास लाखाला गंडा

सांगली : बुधगाव (ता.मिरज) येथील एका वृद्धाच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करून त्यास एक लाख ३ हजार ७०१ रुपयास गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नामदेव दत्तू पाटील (वय ६३, रा. पटवर्धन कॉलनी, बुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पाटील यांचे खाते आहे. या खात्यामुळे २०१७ मध्ये त्यांना क्रेडिट कार्ड मिळाले आहे. आतापर्यंत एकदाही त्यांनी ते वापरले नसून त्यावरून काही खरेदीही केली नाही. तरीही या कार्डचा परस्पर गैरवापर करून अज्ञाताने २१ ते २६ ऑक्टोबर २०२० या कालावधीत इंटरनेट बँकिंगद्वारे विविध प्रकारची ऑनलाईन खरेदी केली आहे. पाटील यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: One lakh gang using credit card in Budhgaon