तिहेरी अपघातात एक ठार
By Admin | Updated: May 22, 2014 00:42 IST2014-05-22T00:35:34+5:302014-05-22T00:42:14+5:30
सांडगेवाडीतील घटना : तिघेजण गंभीर जखमी

तिहेरी अपघातात एक ठार
पलूस : पलूस-तासगाव रस्त्यावर सांडगेवाडीजवळ झालेल्या तिहेरी अपघातात मोटारसायकलचालक रामचंद्र लक्ष्मण जाधव (वय ५५, रा. सांडगेवाडी) ठार झाले. या अपघातात अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पलूसकडे येत असलेल्या मोटारीने सांडगेवाडीकडे निघालेल्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. त्यामुळे मोटारसायकलवरील रामचंद्र जाधव हे मोटारीखाली सापडले. दुचाकीवर सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी छाया जाधव (३६) या बाजूला फेकल्या गेल्या. याच दरम्यान पलूसहून सायकलवरून निघालेल्या सर्जेराव बाबू जाधव (६८, रा. सांडगेवाडी) यांचीही मोटारीला धडक बसली. यात तेही जखमी झाले. जखमींना पलूस येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना सांगलीला उपचारासाठी पाठविण्यात आले. रामचंद्र जाधव यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघाताबाबत सांडगेवाडीतील अवधूत सुखदेव तरटे यांनी पलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)