एसटी बसखाली सापडून एक ठार
By Admin | Updated: April 6, 2015 01:21 IST2015-04-06T01:19:04+5:302015-04-06T01:21:10+5:30
मिरजेतील घटना : चालक ताब्यात

एसटी बसखाली सापडून एक ठार
सांगली : मिरज बसस्थानकानजीक मालगावहून सांगलीकडे जाणाऱ्या एसटीखाली सापडून बाबासाहेब भगवान आडसुळे (वय ३०, रा. औद्योगिक वसाहत, कुपवाड) या युवकाचा आज रविवारी दुपारी मृत्यू झाला.
सुखनिवास लॉजजवळ मालगावहून सांगलीकडे जाणाऱ्या एसटीच्या मागील चाकाखाली पादचारी बाबासाहेब आडसुळे हा युवक सापडला. गंभीर जखमी झालेल्यास नागरिकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. एसटीचालक सहदेव वाघमोडे (रा. गुंडेवाडी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत. फूटपाथवर विक्रेते
सांगली जिल्ह्यात वाहनांची संख्या खूपच वाढली असून, यासाठी रस्ते अपुरे पडत आहेत. सांगली जिल्ह्यात सुमारे साडेपाच लाख वाहनांची संख्या आहे. मिरजेमध्ये रस्त्यात दुभाजक नसल्यामुळे अनेकदा वाहनांची कोंडी होत आहे. त्यातच फूटपाथवर विक्रेते बसत असल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालत जावे लागते. मिरजेतील बसस्थानक परिसर, रेल्वे स्टेशन रस्ता आदी रस्त्यांवर फळ विक्रेत्यांनी फूटपाथ काबीज केले आहेत. पादचाऱ्यांना रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे.