पेठला विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:11+5:302021-05-23T04:26:11+5:30
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील भीमनगर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय युवकाचा पिण्याच्या पाण्याची विद्युत मोटार सुरू करत असताना ...

पेठला विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) येथील भीमनगर परिसरात राहणाऱ्या २९ वर्षीय युवकाचा पिण्याच्या पाण्याची विद्युत मोटार सुरू करत असताना विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना घडली. हा प्रकार शनिवारी दुपारी तीन वाजता झाला.
विशाल राजेंद्र कुरणे (वय २९) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
गावातील पाणी योजनेचे पाणी योग्य दाबाने मिळत नसल्याने सर्वच ग्रामस्थांनी नळ जोडणीला विद्युत मोटारी बसविल्या आहेत. दुपारी तीनच्या सुमारास पाणी सुटल्यावर सर्वजण पाणी भरण्याच्या कामात होते.
विशाल त्याच्या घरासमोरील पाण्याची विद्युत मोटार सुरू करीत होता. यावेळी त्याला विजेचा धक्का बसून तो रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडला. या घटनेने तेथे आरडाओरडा झाल्यावर चंद्रकांत पवार यांनी विशाल कुरणे याला तातडीने इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत सुरेश दिलीप कुरणे यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे.