साखराळेत विजेच्या धक्क्याने एक ठार

By Admin | Updated: May 29, 2014 00:47 IST2014-05-29T00:47:33+5:302014-05-29T00:47:50+5:30

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथे आज, बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वादळी वार्‍याने तुटून शेतात पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून शेतात खत

One killed by electric shock at BK | साखराळेत विजेच्या धक्क्याने एक ठार

साखराळेत विजेच्या धक्क्याने एक ठार

इस्लामपूर : साखराळे (ता. वाळवा) येथे आज, बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वादळी वार्‍याने तुटून शेतात पडलेल्या विजेच्या तारेचा धक्का बसून शेतात खत विस्कटण्यासाठी गेलेल्या कष्टकरी शेतकर्‍याचा बळी गेला. या घटनेची पोलिसांत नोंद झाली आहे. महादेव विठोबा मोरे (वय ४५, रा. साखराळे) असे ठार झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. महादेव मोरे सकाळी शिवाजी माने यांच्या शेतामध्ये खत विस्कटण्यासाठी गेले होते. त्यावेळी वादळी वार्‍याने तुटून शेतात पडलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन त्यांना धक्का बसला. विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस नाईक अनिल कुदळे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: One killed by electric shock at BK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.