बुध येथे एकावर तलवारीने वार

By Admin | Updated: June 14, 2014 01:37 IST2014-06-14T01:20:23+5:302014-06-14T01:37:33+5:30

सहा आरोपींना अटक; एक आरोपी फरार

One killed with Ekwar sword in Mercury | बुध येथे एकावर तलवारीने वार

बुध येथे एकावर तलवारीने वार

पुसेगाव : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बुध करंजओढा, ता. खटाव येथील रामोशी वस्तीवर दोन गटांत झालेल्या मारामारीत डोक्यात तलवारीने वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघांना मार लागला आहे. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्याप एक आरोपी फरार आहे. प्रवीण जाधव असे त्या जखमीचे नाव आहे. वडूज न्यायालयात हजर केले असता आरोपींना दि. १८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायसिंग शंकर जाधव (वय ३५) यांनी याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार रायसिंग व त्यांचे चार भाऊ करंजओढा येथील रामोशीवस्तीत एकत्र राहतात. गावातील काही लोकांशी व त्यांचा बरेच दिवसांपासून शेतीवरून वाद सुरू आहे.
दि. १२ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रायसिंग यांचा पुतण्या प्रवीण जाधव याची मोटारसायकल अडवून भिवाजी मिठू जाधव, मल्हारी मिठू जाधव, तानाजी मिठू जाधव, संदीप तानाजी जाधव, दिलीप मल्हारी जाधव, संदीप बबन जाधव व महेश मल्हारी जाधव (सर्वजण रा. करंजओढा) यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुुरुवात केली. त्यामुळे फिर्यादी रायसिंग व त्यांचे भाऊ तसेच घरातील बायका माणसे भांडणाच्या ठिकाणी जात असतानाच भिवाजी मिठू जाधव याने हातातील तलवारीने प्रवीण याच्या डोक्यात वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी एम. बी. गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र साविंत्रे व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. (वार्ताहर)

Web Title: One killed with Ekwar sword in Mercury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.