शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीची सफाई करताना विजेचा धक्का, एक ठार; सांगलीतील कुपवाड औद्योगिक वसाहतीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 13:37 IST

मिरज : कुपवाड औद्योगिक वसाहतीत श्रीनिवास कोल्ड स्टोअरेजमध्ये पाण्याच्या टाकीची सफाई करताना तीन कामगारांना विजेचा झटका बसला. अपघातात साहिल ...

मिरज : कुपवाड औद्योगिक वसाहतीत श्रीनिवास कोल्ड स्टोअरेजमध्ये पाण्याच्या टाकीची सफाई करताना तीन कामगारांना विजेचा झटका बसला. अपघातात साहिल भरत डांगे (वय २५, रा. पंढरपूर चाळ, मिरज) हा कामगार ठार झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.अमोल व्हटकर (रा. कुपवाड), शिवाप्पा मुरडी (रा. रामपूर, कर्नाटक) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी अमाेल व्हटकर याची प्रकृती चिंताजनक आहे. दाेघांवरही सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत साहिल डांगे यांच्या मृतदेहाची मिरज शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.कुपवाड एमआयडीसीमधील श्रीनिवास कोल्ड स्टोअरेजमध्ये रविवारी सायंकाळी पाण्याच्या टाकीची सफाई सुरू होती. साहिल डांगे व अमोल व्हटकर हे पाण्याच्या टाकीत उतरून साफसफाई करत होते. यावेळी अचानक पाण्याच्या मोटरचा विद्युत प्रवाह सुरू झाल्याने साहिल व अमोल यांना विजेचा जाेरदार धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी शिवाप्पा मुरडी हाही टाकीत उतरला. त्यालाही विजेचा धक्का बसला. विजेच्या जोरदार झटक्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला. अमोल व शिवप्पा हे दोघे जखमी झाले. साहिलच्या मृत्यूची माहिती कळताच मिरज शासकीय रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली. पोलिसही रुग्णालयात दाखल झाले. कोल्ड स्टोअरेज मालकावर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा साहिलचे नातेवाईक व रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी घेतल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. रात्री उशिरापर्यंत साहिलचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला नव्हता.

टॅग्स :SangliसांगलीDeathमृत्यू