कामेरीजवळ दुचाकीवरून पडून एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST2021-03-01T04:30:41+5:302021-03-01T04:30:41+5:30
इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी ते कामेरी दरम्यानच्या परिसरात अवजड वाहनाचा प्रकाशझोत डोळ्यावर पडल्याने रस्त्याचा अंदाज चुकून दुचाकीवरून पडून ...

कामेरीजवळ दुचाकीवरून पडून एकजण ठार
इस्लामपूर : राष्ट्रीय महामार्गावर विठ्ठलवाडी ते कामेरी दरम्यानच्या परिसरात अवजड वाहनाचा प्रकाशझोत डोळ्यावर पडल्याने रस्त्याचा अंदाज चुकून दुचाकीवरून पडून एकजण जागीच ठार झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्रीनंतर पावणेदोनच्या सुमारास घडला.
जगन्नाथ यशवंत शिंदे (वय ५५, रा. कामेरी) असे मृताचे नाव आहे. शिंदे हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १० बी २९७१) विठ्ठलवाडीहून कामेरीकडे निघाले होते. प्रखर प्रकाशझोतामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे ते रस्त्यावर आदळले. यामध्ये त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस गंभीर इजा पोहोचली. अतिरक्तस्त्राव झाल्याने रस्त्यावरच ते बेशुद्ध पडले होते. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोेलीस हवालदार श्रीकांत अभंगे अधिक तपास करीत आहेत.