दुधारीजवळ बस-दुचाकीच्या धडकेत एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:19 IST2021-07-16T04:19:49+5:302021-07-16T04:19:49+5:30
इस्लामपूर : ताकारी-कऱ्हाड रस्त्यावरील दुधारी (ता. वाळवा) गावच्या हद्दीत सकाळी ११.४५ च्या सुमारास बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या ...

दुधारीजवळ बस-दुचाकीच्या धडकेत एक जखमी
इस्लामपूर : ताकारी-कऱ्हाड रस्त्यावरील दुधारी (ता. वाळवा) गावच्या हद्दीत सकाळी ११.४५ च्या सुमारास बस आणि दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला. अविनाश आनंदा कांबळे (वय ४०, रा. दह्यारी, ता. पलूस) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत एसटीचालक सुनील राजाराम पाटील (रा. अंजनी, ता. तासगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ते वाहक सहदेव कोळी यांना सोबत घेऊन कवठेमहांकाळ ते वल्लभनगर (पुणे) या मार्गावर बस (क्र. एमएच ४० एन ९४९६) ही घेऊन निघाले होते. दुधारी गावाजवळ आल्यानंतर कऱ्हाडकडून भरधाव वेगाने अविनाश कांबळे हा आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच ०९-एवाय ३७) येत असल्याचे दिसल्यावर चालक पाटील यांनी बस थांबवली. मात्र अविनाश कांबळे हा दुचाकीवरून येऊन थेट बसच्या डाव्या बाजूवर येऊन धडकला. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बसचे २० हजार रुपयांचे, तर दुचाकीचे ५ हजार रुपयांचे नुुकसान झाले आहे. हवालदार अरुण पाटील अधिक तपास करीत आहेत.