डालमिया साखर कामगारांचे शंभर टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST2021-09-15T04:30:54+5:302021-09-15T04:30:54+5:30
कोकरुड : डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड शुगर युनिट निनाईदेवी कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगारांना कोरोना प्रतिबंधक ...

डालमिया साखर कामगारांचे शंभर टक्के लसीकरण
कोकरुड : डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड शुगर युनिट निनाईदेवी कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. आरळा (ता. शिराळा) येेेथील शिवाजीराव देशमुख कृषी कॉलेज या ठिकाणी लसीकरण झाले.
चरण येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टर, आरोग्यसेवक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज युनिट निनाईदेवी कारखान्याचे एस. रंगाप्रसाद, संतोष कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यातील सुमारे २५९ जणांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज युनिट निनाईदेवी कारखाना युनिटचे संतोष कुंभार, एच. आर. विभागाचे अधिकारी शिवाजी पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मोरे, श्रीराम कोडगुले, प्रकल्प अधिकारी सुनील कांबळे, विनित रेड्डी, वैभव कदम, इक्बाल डांगे, विक्रम घोलप, प्राथमिक आरोग्य केंद्र, चरणचे डॉ. वसीम जमादार, डॉ. साहील कादरी, डॉ. स्वप्नील मगदूम, डॉ. धनश्री नायकवडी, एस. बी. संदे, एस. एम. केजगे आदींसह कारखान्यातील प्रमुख पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटोओळी: लसीकरण मोहीमप्रसंगी डालमिया भारत शुगरचे युनिट हेड संतोष कुंभार, शिवाजी पाटील, सुनील कांबळे आदी.