कडेगाव तालुक्यात लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:27 IST2021-05-07T04:27:50+5:302021-05-07T04:27:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. अत्यावश्यक सेवा ...

One hundred percent response to lockdown in Kadegaon taluka | कडेगाव तालुक्यात लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

कडेगाव तालुक्यात लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील सर्व दुकाने बंद आहेत.

कडेगाव शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले कराड - विटा रस्ता, तडसर रोड,

बसस्थानक परिसर आदी परिसरासह सर्वत्र नीरव शांतता निर्माण झाली आहे. अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते. औषध दुकाने मात्र सुरू होती.

कडेगाव शहर, वांगी, देवराष्ट्रे, कडेपूर, शाळगाव, तडसर, चिंचणी सह सर्व गावांमध्ये मुख्य ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट आहे. कडेगाव व चिंचणीसह तालुक्यात महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. नेहमी गजबजणारे कडेगाव शहर आणि परिसरात एकदम शांतता निर्माण झाली. निर्मनुष्य रस्ते, नीरव शांतता यामुळे गतवर्षीच्या लॉकडाऊनची आठवण झाली.

पोलीस आणि गावोगावची आपत्ती व्यवस्थापन पथके रस्त्यावर उतरली. सर्व रस्ते रिकामे निर्मनुष्य झाले आहेत. वर्दळ शांत होऊन रस्ते ओस पडले आहेत.

Web Title: One hundred percent response to lockdown in Kadegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.