वांगीत लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:27 IST2021-05-08T04:27:05+5:302021-05-08T04:27:05+5:30

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे दि. १ पासून सुरू केलेल्या पाच दिवसांच्या बंदनंतर जिल्हा ...

One hundred percent response to eggplant lockdown | वांगीत लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

वांगीत लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे दि. १ पासून सुरू केलेल्या पाच दिवसांच्या बंदनंतर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक लॉकडाऊनलाही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. गेल्या सात दिवसांपासून सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे.

वांगी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाबाधित व विलगीकरणात असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना अत्यावश्यक साहित्य संबंधित वाॅर्डमधील ग्रामपंचायत सदस्य व दक्षता समिती सदस्य दुकानदारांकडून खरेदी करून उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे साखळी तुटण्यास मदत होत आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांवर चिंचणी-वांगी पोलिसांनी कारवाईचा पवित्रा घेतल्यामुळे वांगीतील चौकांत शुकशुकाट पसरला आहे.

येथील औषध दुकाने, रुग्णालये व दूध डेअरी सोडून शंभर टक्के लॉकडाऊन स्वयंप्रेरणेने पाळण्यात आला आहे.

Web Title: One hundred percent response to eggplant lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.