मिरजेत शंभर फुटी रस्ता कोल्हापूर रोडला जोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:09+5:302021-03-13T04:48:09+5:30
खाँजा वसाहतीत कोल्हापूर रस्त्याला जोडणाऱ्या शंभर फुटी रस्त्याची पाहणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर ...

मिरजेत शंभर फुटी रस्ता कोल्हापूर रोडला जोडणार
खाँजा वसाहतीत कोल्हापूर रस्त्याला जोडणाऱ्या शंभर फुटी रस्त्याची पाहणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी पाहणी केली. हा रस्ता कोल्हापूर रस्त्याला जोडल्याने येथील नागरिकांना फायदा होणार आहे. त्यामुळे हा विषय महासभेत घेण्यापूर्वी रस्त्याची पाहणी करून लोकांची मते जाणून घेतली.
येथे असलेल्या नैसर्गिक नाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरत असल्याने हा नाला बंदिस्त करण्यात येणार आहे. या नाल्याची पाहणी करण्यात आली. या दोन्ही प्रश्नांबाबत या भागातील नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे महापौर व आयुक्तांनी पाहणी केली. दोन्ही प्रश्नांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय बजाज, योगेंद्र थोरात, नगरसेविका संगीता हारगे, अभिजित हारगे, हारूण खतीब, वाजिद खतीब, विजय माळी यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.