शिरगुपी : प्रेयसीला त्रास देत असल्याच्या कारणावरून दीपक चिदानंद बाने या तरुणाचा कृष्णा नदीच्या महापुरात ढकलून देऊन खून केल्याप्रकरणी एकाला अथणी येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रियाज सिराज मुजावर असे आरोपीचे नाव आहे. ही घटना १२ ऑगस्ट २०२० रोजी घडली होती.याबाबत माहिती अशी की, मृत दीपक बाने हा १२ ऑगस्ट २०२० रोजी बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने कागवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा शोध घेताना पोलिसांनी आरोपी रियाज मुजावर याने त्याचा खून केल्याची माहिती मिळाली. आरोपी मुजावर हा कुडची येथील एका रुग्णालयात कर्मचारी होता. त्याच्या प्रेयसीला दीपक त्रास देत होता. यामुळे तो दीपकवर चिडून होता. त्यांच्या वादही झाला होता. १२ ऑगस्ट रोजी सव्वाआठ वाजता रियाज हा दीपकला कुडची रेल्वे पुलावर घेऊन गेला. तिथे त्याला दारू पाजली. यावेळी कृष्णा नदीला पूर आलेला होता. त्याने दीपकला पुराच्या पाण्यात फेकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रिजाय मुजावर याला अटक करून अथणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश इराना ई.एस. यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने रियाज मुजावर याला जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
Web Summary : A man received life imprisonment for murdering a youth in Sangli. The accused threw him into a flooded river for allegedly harassing his girlfriend. The incident occurred in August 2020; the court delivered the verdict after a trial.
Web Summary : सांगली में एक युवक की हत्या के मामले में एक व्यक्ति को आजीवन कारावास की सजा सुनाई गई। आरोपी ने कथित तौर पर अपनी प्रेमिका को परेशान करने के कारण उसे बाढ़ में फेंक दिया। घटना अगस्त 2020 में हुई; अदालत ने मुकदमे के बाद फैसला सुनाया।