गोटखिंडीत उसाच्या ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:53+5:302020-12-13T04:40:53+5:30

गोटखिंडी परिसरात सध्या ऊसतोडी सुरू आहेत. गोटखिंडी-बावची परिसरात विविध साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक केली जात आहे. सुरेश देसाई यांचा ...

One found dead under sugarcane trolley in Gotkhindi | गोटखिंडीत उसाच्या ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू

गोटखिंडीत उसाच्या ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू

गोटखिंडी परिसरात सध्या ऊसतोडी सुरू आहेत. गोटखिंडी-बावची परिसरात विविध साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक केली जात आहे. सुरेश देसाई यांचा ट्रॅक्टरही (एमएच ०९ यु. ५८४०) ऊस वाहतुकीसाठी लावला होता. शनिवारी गोटखिंडीतील महाडिक मळा परिसरात ऊसतोड सुरू होती. सायंकाळच्यावेळी देसाई यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत ऊस भरायचे काम चालू होते. यावेळी देसाई त्या ठिकाणी हजर होते. चालक ट्रॅक्टर बाहेर काढत असताना अचानक चाक मातीत रुतले. थोड्याच वेळात उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाली. यावेळी शेजारीच उभे असणारे देसाई ट्रॉलीखाली सापडले.

ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी सर्व ऊस बाजूला घेतला; मात्र तोपर्यंत ट्रॉलीखाली दबलेल्या सुरेश देसाई यांचा गुदमरुन मृत्यू झाला. या घटनेची रात्री उशिरापर्यंत आष्टा पोलीस ठाण्यात नोंद नव्हती.

फोटो-१२गोटखिंडी२

Web Title: One found dead under sugarcane trolley in Gotkhindi