शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

इस्लामपुरात कव्वाली कार्यक्रमात एकाचा हवेत गोळीबार, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाकडे रोख; व्हिडीओ व्हायरल

By श्रीनिवास नागे | Updated: October 14, 2022 13:08 IST

या घटनेचा व्हिडीओ आज, शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर या गोळीबाराची शहरात मोठी चर्चा होत आहे.

सांगली : इस्लामपूर शहरातील मोमीन मोहल्ला परिसरात सोमवारी (दि.१०) रात्री राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने आयोजित केलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडीओ आज, शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर या गोळीबाराची शहरात मोठी चर्चा होत आहे.  ईद ए मिलादुनबीनिमित्त येथील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पीरअली पुणेकर विश्वस्त असलेल्या ख्वाजा गरीब नवाज सोशल वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने सोमवारी रात्री कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.त्यानंतर काही वेळाने कार्यक्रम सुरू असतानाच रंगमंचावर बसलेल्या एकाने बाजूला जात आपल्याकडील पिस्तुलातून हवेत काही फैरी झाडल्या. त्यानंतर तो पुन्हा व्यासपीठावर येऊन बसला. सोमवारी रात्री झालेल्या या गोळीबाराचा व्हिडीओ आज (शुक्रवारी) सकाळपासून व्हायरल झाल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांशी या घटनेबाबत विचारणा करण्यासाठी संपर्क साधल्यावर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस