काकाचीवाडी येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:50 IST2021-02-18T04:50:20+5:302021-02-18T04:50:20+5:30

बागणी : काकाचीवाडी (ता. वाळवा) येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यूू झाला; तर एकजण जखमी झाला. विशाल लोहार असे मृताचे ...

One dies in electric shock at Kakachiwadi | काकाचीवाडी येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

काकाचीवाडी येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

बागणी : काकाचीवाडी (ता. वाळवा) येथे विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यूू झाला; तर एकजण जखमी झाला. विशाल लोहार असे मृताचे नाव आहे, तर रणजित भोई जखमी झाले आहेत.

येथील ढवळी रस्त्याला बागणीचे कोतवाल रणजित भोई यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू आहे. या घरामध्ये विजेचे कनेक्शन घेत असताना भोई व विशाल लोहार हे विद्युत तार ओढण्यासाठी खड्डा काढून लोखंडी पोल रोवत होते. यावेळी अचानक तोल न सावरल्यामुळे लोखंडी पोल जवळच असणाऱ्या ११ के. व्ही. विद्युत तारांवर पडला. त्यामुळे विशाल यांचा जागेवरच मृत्यू झाला; तर कोतवाल रणजित भोई यांच्या हाताला व पायला भाजले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशाल लोहार यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा, दोन चुलते, दोन चुलत्या, चुलत भाऊ असा परिवार आहे.

Web Title: One dies in electric shock at Kakachiwadi