वांगीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 7, 2014 00:20 IST2014-06-07T00:17:00+5:302014-06-07T00:20:49+5:30

विहिरीवरील विद्युत पंप सुरू करताना घटना

One death due to electric shocks in Bangladesh | वांगीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

वांगीत विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे विहिरीवरील विद्युत पंप सुरू करताना विजेचा धक्का बसूून रघुनाथ गणपती एडके (वय ४०) यांचा जागीचा मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी साडेसात वाजता घडली.
वांगी येथील बिरोबावाडी येथे रघुनाथ एडके कुटुंबासह रहात होते. शुक्रवार, दि. ६ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एडके पाणी भरण्यासाठी घरापासून जवळ असणाऱ्या समाईक विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले. तेथे फ्यूज बसवित असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
रघुनाथ एडके विहिरीत आडवे बोअर मारण्याचा व्यवसाय करीत होते. गरीब परिस्थितीतून कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करीत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत होती. कैलास शंकर एडके (रा. वांगी) यांनी चिंचणी-वांगी पोलिसांत माहिती दिली. (वार्ताहर)

 

Web Title: One death due to electric shocks in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.