मिरज सिव्हीलला एक कोटीची वैद्यकीय यंत्रसामुग्री भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:47+5:302021-09-10T04:33:47+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात वैद्यकीय सामग्रीची कमतरता भासू नये, यासाठी मुंबईतील अमेरीकेअर इंडिया ...

मिरज सिव्हीलला एक कोटीची वैद्यकीय यंत्रसामुग्री भेट
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात वैद्यकीय सामग्रीची कमतरता भासू नये, यासाठी मुंबईतील अमेरीकेअर इंडिया फाउंडेशनतर्फे बालरुग्णालयास लागणाऱ्या एक कोटी रुपये किमतीची आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री देणगी स्वरूपात देण्यात आली. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना उपचार मिळावे, यासाठी बालरुग्णालयास आवश्यक व्हेंटिलेटर, जीसीजी, नेबुलायझर, बिपाप आदी आधुनिक वैद्यकीय साहित्य देण्यात आले.
या संस्थेतर्फे यापूर्वीही कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत एक कोटीपेक्षा जास्त रकमेचे वैद्यकीय साहित्य देण्यात आले होते. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना फाउंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. श्रीपाद देसाई व जिल्हा व्यवस्थापक गणेश पाटील यांनी साहित्य भेट दिले. यावेळी सहायक अधिष्ठाता डॉ. रूपेश शिंदे, डॉ. शिरीष मिरगुंडे, डॉ. प्रकाश गुरव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.