अरुण लाड यांच्याकडून एक कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:21+5:302021-04-30T04:34:21+5:30

सांगली : पदवीधर मतदरासंघातील आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसाठी ...

One crore fund from Arun Lad | अरुण लाड यांच्याकडून एक कोटीचा निधी

अरुण लाड यांच्याकडून एक कोटीचा निधी

सांगली : पदवीधर मतदरासंघातील आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसाठी तब्बल एक कोटीचा निधी देण्यात आला आहे. यातुन ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले आहेत.

कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण वाढत असताना त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. कोणताही रुग्ण उपचाराअभावी दगावू नये म्हणून त्या त्या जिल्ह्यातील सर्व बाबींचा आढावा घेऊन आमदार अरुण लाड यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शल्य चिकित्सकांशी चर्चा केली. यानंतर ही उपकरणे त्यांच्या स्वीय निधीतून पाचही जिल्ह्यांत उपलब्ध करून देत आहेत.

आपल्या स्वीय निधीतील एवढा निधी केवळ वैद्यकीय सुविधेसाठी देणारे ते पहिलेच पदवीधर आमदार आहेत.

यापूर्वी विधिमंडळ सदस्यांना ५० लाखांपर्यंत वैद्यकीय सुविधेसाठी खर्च करण्यात येत होते; परंतु तो निधीही कोणाकडून खर्च केला जात नव्हता. परंतु वाढीव तरतुदीत एक कोटीपर्यंत हा निधी खर्च करण्याची अनुमती दिली आणि सर्वच्या सर्व निधी वैद्यकीय सुविधेसाठी त्यांनी देऊ केला आहे. या त्यांच्या सुविधेमुळे प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा भक्कम होईल आणि सामान्य नागरिकांनाही आपला जीव ऑक्सिजनअभावी गमवावा लागणार नाही.

कोट

कोणताही रुग्ण ऑक्सिजनशिवाय दगावू नये यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. यापुढेही प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा भक्कम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

- आमदार अरुण लाड

Web Title: One crore fund from Arun Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.