शिराळ्यात एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:25 IST2021-04-15T04:25:51+5:302021-04-15T04:25:51+5:30

शिराळा : येथील शिंदे गल्ली येथे राहणारे संभाजी रघुनाथ कदम (वय ५०) यांनी नैराश्येतून पाडळी रस्ता येथील ...

One commits suicide in Shirala | शिराळ्यात एकाची आत्महत्या

शिराळ्यात एकाची आत्महत्या

शिराळा : येथील शिंदे गल्ली येथे राहणारे संभाजी रघुनाथ कदम (वय ५०) यांनी नैराश्येतून पाडळी रस्ता येथील अक्षय क्षीरसागर यांच्या विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली.

संभाजी कदम यांच्या पत्नीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले असून तेव्हापासून ते नैराश्येत असत. मंगळवार, दि. १३ रोजी रात्री नऊ वाजता घरात कोणासही काही न सांगता ते बाहेर गेले होते. बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान त्यांचा मृतदेह अक्षय क्षीरसागर यांच्या विहिरीत तरंगताना दिसला. त्यांच्या पश्चात आई, वडील, मुलगा, बहीण असा परिवार आहे.

या घटनेबाबत शिवाजी वसंतराव शिंदे यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून सहायक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे तपास करीत आहेत.

Web Title: One commits suicide in Shirala