इस्लामपुरात एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:25 IST2021-02-12T04:25:47+5:302021-02-12T04:25:47+5:30

इस्लामपूर : शहरातील जुनी गणेश मंडई परिसरात असणाऱ्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहणाऱ्या ३१ वर्षीय युवकाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

One commits suicide in Islampur | इस्लामपुरात एकाची आत्महत्या

इस्लामपुरात एकाची आत्महत्या

इस्लामपूर : शहरातील जुनी गणेश मंडई परिसरात असणाऱ्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहणाऱ्या ३१ वर्षीय युवकाने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार सकाळी साडेसहाच्या पूर्वी घडला आहे. दरम्यान, पतीच्या आत्महत्येची चौकशी करावी, अशी मागणी पत्नीने पोलिसांकडे फिर्याद देऊन केली आहे.

संग्राम वसंतराव कदम (३१, रा. कापूसखेड नाका, इस्लामपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो शहरातील एका गॅरेजमध्ये काम करत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आर्थिक देवघेव आणि दुचाकीचे व्यवहार यातून हा प्रकार घडला असण्याची चर्चा घटनास्थळी होती. दरम्यान, संग्रामची पत्नी लक्ष्मी कदम यांनी पतीच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी करावी, अशी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस नाईक सचिन स्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: One commits suicide in Islampur