शिंदेवाडी येथे एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:29 IST2021-02-16T04:29:11+5:302021-02-16T04:29:11+5:30
कोकरूड : शिंदेवाडी (ता. शिराळा) येथे शेतात दगड टाकल्याच्या कारणावरून एकास खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. याबाबत कोकरूड पोलिसात ...

शिंदेवाडी येथे एकास मारहाण
कोकरूड : शिंदेवाडी (ता. शिराळा) येथे शेतात दगड टाकल्याच्या कारणावरून एकास खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. याबाबत कोकरूड पोलिसात एकमेकांविरुद्ध परस्पर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
शिंदेवाडी येथील दिलीप मारुती शिंदे (वय ३८) हे शेतात ऊसतोड करत असताना त्याचा चुलत भाऊ विकास कृष्णात शिंदे याने शेतात दगड टाकल्याच्या कारणातून शिवीगाळ केली. तसेच दिलीप यांना लोखंडी खोऱ्याने मारहाण करत जखमी केले, तर विकास कृष्णा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दिलीप याने शेतातून उसाचा ट्रॅक्टर जाण्यासाठी वाट केली असून, याबाबत दिलीप यास विचारणा केली असता त्याने शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अधिक तपास पोलीस नाईक अजहर गोवंडी करत आहेत.