सांगलीत भांडणातून एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:31 IST2021-08-12T04:31:08+5:302021-08-12T04:31:08+5:30

--------- बुधगाव येथून मोटारसायकल लंपास सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. ...

One beaten in Sangli quarrel | सांगलीत भांडणातून एकाला मारहाण

सांगलीत भांडणातून एकाला मारहाण

---------

बुधगाव येथून मोटारसायकल लंपास

सांगली : बुधगाव (ता. मिरज) येथे घरासमोर पार्क केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी नितीन दादू पाटील (वय ५५) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

-----------

अहिल्यानगरच्या तरुणाची दुचाकी चोरीला

सांगली : अहिल्यानगर येथील तरुणाची दुचाकी चोरट्याने लांबविली. ही घटना सोमवारी रात्री १२ वाजता बुधगाव पेट्रोलपंपाजवळ घडली. या प्रकरणी प्रशांत कुमार जाधव (वय २३) याने सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. बुधगाव पेट्रोलपंपाजवळ जाधव रस्त्याकडेला दुचाकी लावून लघुशंकेसाठी गेला असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्याची मोटारसायकल घेऊन पोबारा केला.

-------------------

गावभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी

सांगली : पूरग्रस्त भागातील नागरिक ताप, सर्दी, खोकला, त्वचा रोग व डेंग्यूसारख्या आजारांनी त्रस्त आहेत. महापालिकेने पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे. गावभाग परिसरातील प्रशिक चौक, ढोर गल्ली या भागात आरोग्य विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. या वेळी डाॅ. शीतल धनवडे, संतोष कदम उपस्थित होते.

Web Title: One beaten in Sangli quarrel