सांगलीत पैशांच्या देवघेवीतून एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:40+5:302021-02-06T04:47:40+5:30
सांगली : शहरातील शिवशंभो चौकात पैशांच्या देवघेवीवरून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सुमैया ओवेस सय्यद (रा. शिवशंभो चौक, ...

सांगलीत पैशांच्या देवघेवीतून एकास मारहाण
सांगली : शहरातील शिवशंभो चौकात पैशांच्या देवघेवीवरून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सुमैया ओवेस सय्यद (रा. शिवशंभो चौक, सांगली) हिने आशीष रमेश तिवारी, शुभम प्रदीप दुबे (दोघेही रा. मूळ मुंबई, सध्या सांगली), प्रवीण विश्वनाथ आरते, अमर रमेश मोरे (दोघेही रामनगर, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २ फेब्रुवारी रोजी फिर्यादी सय्यद ही पती, नणंद यांच्यासमवेत मुंबईला जात असताना, संशयितांनी त्यांना पैशांच्या देवघेवीवरून वाद काढत मारहाण केली. फिर्यादी सुमैया हिचा मित्र वाद सोडविण्यासाठी गेला असता, त्यासही संशयितांनी लाकडी बांबूने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची शहर पोलिसात नोंद असून पोलीस पुढील तपास करत आहेत.