बोरगाव येथे किरकोळ कारणातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:36 IST2020-12-30T04:36:17+5:302020-12-30T04:36:17+5:30

इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या वादाच्या कारणातून चौघांजणांनी एकास उसाने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही ...

One beaten for minor reasons at Borgaon | बोरगाव येथे किरकोळ कारणातून एकास मारहाण

बोरगाव येथे किरकोळ कारणातून एकास मारहाण

इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे शेतजमिनीच्या वादाच्या कारणातून चौघांजणांनी एकास उसाने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

याबाबत अमोल उत्तम वाटेगावकर (वय ३०) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार निवृत्ती यशवंत वाटेगावकर, विश्वजित निवृत्ती वाटेगावकर, सागर विठ्ठल वाटेगावकर, अभिजित विठ्ठल वाटेगावकर (सर्व रा. बोरगाव) यांंच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद केला आहे.

अमोल वाटेगावकर शेतातील बाभळीची झाडे तोडण्यासाठी महादेव बोराटे या मजुरास घेऊन गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या निवृत्ती वाटेगावकर याने बोराटे याला आमच्या शेतातीलसुद्धा झाडे तोड असे सांगितले. अमोल वाटेगावकर यांनी मजुरीने गडी लावला आहे, असे म्हणताच वरील चौघांनी त्यांना उसाने मारहाण करत जखमी केले व धमकी दिली.

Web Title: One beaten for minor reasons at Borgaon