मालगावमध्ये एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:01+5:302021-03-07T04:24:01+5:30

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे तरूणाला काठीने मारहाण करण्यात आली. राजाराम बंडू खरात असे जखमीचे नाव असून, शुक्रवारी ...

One beaten in Malgaon | मालगावमध्ये एकाला मारहाण

मालगावमध्ये एकाला मारहाण

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे तरूणाला काठीने मारहाण करण्यात आली. राजाराम बंडू खरात असे जखमीचे नाव असून, शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

सायकलवरून पडून जखमी

सांगली : सायकलवरून पडून झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील एकजण जखमी झाला. मोहन वसंत लोटके (वय ४४्) असे जखमीचे नाव असून, शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

सांगलीत महिलेला मारहाण

सांगली : शहरातील गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात महिलेला मारहाण करण्यात आली. सारिका राेहित कोळी (वय २५) असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. तिला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

--

सावळीत अपघातात एक जखमी

सांगली : सावळी (ता. मिरज) येथील तरूण अपघातात जखमी झाला. राजू आनंदा कांबळे (वय ३४) असे जखमीचे नाव असून, शुक्रवारी हा अपघात झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.

--

बेडग येथील महिलेला विषबाधा

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील महिलेला विषबाधा झाली. अर्चना संदीप कणसे असे त्यांचे नाव असून, शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

Web Title: One beaten in Malgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.