कवलापूरमध्ये एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST2021-03-23T04:28:29+5:302021-03-23T04:28:29+5:30

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे एकास मारहाण करण्यात आली. रूबीन गुलाब मोहिते (वय ५४) असे जखमीचे नाव असून, ...

One beaten in Kavalapur | कवलापूरमध्ये एकास मारहाण

कवलापूरमध्ये एकास मारहाण

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे एकास मारहाण करण्यात आली. रूबीन गुलाब मोहिते (वय ५४) असे जखमीचे नाव असून, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

सांगलीत एकास मारहाण

सांगली : शहरातील मार्केट यार्ड परिसरात तरुणास मारहाण करण्यात आली. कुणाल राजू मुळके (वय १८) असे जखमीचे नाव असून, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यास उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

म्हैसाळमध्ये अपघातात एक जखमी

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथे दुचाकीवरून पडून एकजण जखमी झाला. ऐनुद्दीन मोमीन (वय ५५) असे जखमीचे नाव आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

---

मालगावमध्ये एकास विषबाधा

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथे एकास विषबाधा झाली. सुभाष मल्लाप्पा कोळी (वय ५५) असे त्यांचे नाव असून, रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: One beaten in Kavalapur