सांगलीत एकास फरशीने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:31 IST2021-09-06T04:31:02+5:302021-09-06T04:31:02+5:30

सांगली : शहरातील वडर कॉलनी परिसरात दुकानासमोर दंगा करत असल्याचा जाब विचारल्यावरून एकास फरशीने मारहाण करत जखमी करण्यात आले. ...

One beaten to death in Sangli | सांगलीत एकास फरशीने मारहाण

सांगलीत एकास फरशीने मारहाण

सांगली : शहरातील वडर कॉलनी परिसरात दुकानासमोर दंगा करत असल्याचा जाब विचारल्यावरून एकास फरशीने मारहाण करत जखमी करण्यात आले. याप्रकरणी पांडुरंग पंडीत गुंजी (वय ५८ ) यांनी अजय पांडुरंग खोत, पवन सागर बुचडे यांच्यासह चौघाजणांविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. शनिवारी रात्री हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,जखमी गुंजी याचे वडर कॉलनी परिसरातील क्रांती चौकात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानासमोर संशयित सतत थांबून दंगा करत असत. यावरून गुंजी यांनी त्यांना समजावले होते. तरीही त्यांच्याकडून हा प्रकार सुरूच होता. शनिवारी रात्री यावरून पुन्हा एकदा गुंजी यांनी संशयितांना जाब विचारला असता, त्यातून त्यांच्या वादावादी झाली व संशयितांनी गुंजी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यातील एकाने फरशीने त्यांना मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One beaten to death in Sangli