जुनेखेडमध्ये एकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:21 IST2021-05-03T04:21:20+5:302021-05-03T04:21:20+5:30
इस्लामपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथे शेत नांगरण्याच्या कारणातून तिघांनी मिळून एकास हाताला चावा घेत पीव्हीसी पाइपने मारहाण करून ...

जुनेखेडमध्ये एकास बेदम मारहाण
इस्लामपूर : जुनेखेड (ता. वाळवा) येथे शेत नांगरण्याच्या कारणातून तिघांनी मिळून एकास हाताला चावा घेत पीव्हीसी पाइपने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी २.३०च्या सुमारास घडला.
याबाबत जखमी प्रवीण संपत पाटील (वय ३४) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहन निवृत्ती पाटील, बंड्या मोहन पाटील आणि मदन बाळासाहेब पाटील या तिघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील संशयित हे शुक्रवारी दुपारी शेत नांगरत होते. त्यावेळी प्रवीण पाटील यांनी माझे शेत का नांगरत आहात अशी विचारणा केली. त्यावेळी मोहन याने हे माझे शेत आहे, तुला काय करायचे ते कर अशी धमकी दिली. यावेळी झालेल्या वादात मोहन याने प्रवीणच्या हाताला चावा घेतला. तर इतर दोघांनी त्याला पाइपने मारहाण करून जखमी केले. हवालदार मासाळ अधिक तपास करत आहेत.