कुपवाडमध्ये धारदार हत्यारासह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:32 IST2021-09-07T04:32:45+5:302021-09-07T04:32:45+5:30

कुपवाड : शहरातील अहिल्यानगर चौकात रविवारी मध्यरात्री गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयित तरुणाला कुपवाड पोलिसांनी धारदार कोयत्यासह ...

One arrested with sharp knife in Kupwad | कुपवाडमध्ये धारदार हत्यारासह एकाला अटक

कुपवाडमध्ये धारदार हत्यारासह एकाला अटक

कुपवाड : शहरातील अहिल्यानगर चौकात रविवारी मध्यरात्री गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयित तरुणाला कुपवाड पोलिसांनी धारदार कोयत्यासह अटक केली. अविनाश शन्मुगम मद्रासी (वय ३४, रा. अहिल्यानगर, कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री कुपवाड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक तुषार काळेल, सहाय्यक पोलीस फौजदार युवराज पाटील, सतीश माने, शिवाजी ठोकळ हे शहरात गस्त घालत होते. अहिल्यानगर चौकातून एक तरुण लगबगीने जात असताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या कमरेला धारदार कोयता पोलिसांना मिळाला. तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील धारदार कोयता जप्त केला आहे.

Web Title: One arrested with sharp knife in Kupwad