वाळवा-तुजारपूर रस्त्यासाठी साडेअकरा लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:28+5:302021-06-03T04:19:28+5:30
वाळवा : वाळवा ते तुजारपूर रस्ता खूप खराब झाल्यामुळे जिल्हा नियोजनमधून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद ...

वाळवा-तुजारपूर रस्त्यासाठी साडेअकरा लाख
वाळवा : वाळवा ते तुजारपूर रस्ता खूप खराब झाल्यामुळे जिल्हा नियोजनमधून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ११ लाख ५० हजारांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती डॉ. सुषमा नायकवडी यांनी दिली.
वाळवा-तुजारपूर रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ सरपंच डॉ. शुभांगी माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डाॅ. सुषमा नायकवडी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, वाळवा ते तुजारपूर रस्ता खराब झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली होती. नागरिकांकडून रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी होती, म्हणून तत्काळ प्रस्ताव तयार करून निधी मिळविला आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
यावेळी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती डॉ. सुषमा नायकवडी, उपसरपंच पोपट अहिर, ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे, इसाक वलांडकर, आशा कदम, मनीषा माळी, डॉ. अशोक माळी, मानाजी सापकर, काँग्रेसचे राजू वलांडकर उपस्थित होते.