शहरं
Join us  
Trending Stories
1
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
2
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
3
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
4
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
5
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
6
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
7
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
8
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
9
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
10
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
11
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
12
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
13
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
14
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
15
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
16
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
17
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
18
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
19
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख लाडक्या बहिणींचे दीड हजार रोखले

By अशोक डोंबाळे | Updated: September 1, 2025 19:30 IST

पडताळणीत माहिती उघड : कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणी घेत आहेत योजनेचा लाभ

अशोक डोंबाळेसांगली : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार ९४४ लाभार्थी होते. यापैकी एक लाख ७० हजार ७२९ लाडक्या बहिणींना शासकीय नोकरी, चारचाकी वाहन, कुटुंबांत दोनपेक्षा जास्त लाभार्थीं अशा विविध कारणांमुळे अपात्र ठरविले आहे. या सर्व लाडक्या बहिणींचे लाभ रद्द होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी महिन्याला येणारे २५ कोटी ६० लाख ९३ हजार ५०० रुपये बंद झाले आहेत.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात सात लाख ३५ हजार ९४४ लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत. या बहिणींना महिना दीड हजार रुपयांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतल्यानंतर जिल्ह्यात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला; पण यादरम्यान बोगस लाभार्थ्यांनी योजनेत सहभागी होत पैसा लाटल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने अशा लाडक्या बहिणींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७८ हजार ४७८ लाडक्या बहिणी योजनेस अपात्र ठरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासकीय नोकरीत असणाऱ्या १० महिला कर्मचाऱ्यांचा लाभ शासनाने बंद केला आहे. तिसऱ्या टप्प्यांत अनेक अपात्र लाभार्थी तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे माहिती पुढे आले आहे. जिल्ह्यातील सात लाख ३५ हजार ९४४ लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष त्यांच्या कुटुंबांना भेट देऊन पडताळणी केली जात आहे.जवळपास ८० टक्के पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यात जिल्ह्यातील ७४ हजार ४९४ कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असल्याचे पुढे आले आहे तर २१ ते ६५ वयोगटांतील १४ हजार ७४७ लाभार्थी अपात्र झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ८९ हजार २४१ लाडक्या बहिणी या योजनेस अपात्र ठरल्या आहेत, असे महिला व बालकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.

  • पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींचे असे लाभ रद्द
  • बँकेच्या पासबुकमध्ये डबल नाव : ११६६
  • एका प्रोफाइलवरून ५००, १००० पेक्षा जास्त अर्ज भरणे : ५७१९२
  • लाभार्थींकडे चारचाकी वाहन : २०१२०

दुसऱ्या टप्प्यात शासकीय नोकरीतील महिलांचा लाभ बंदजिल्हा परिषदेत सरकारी नोकरीत असतानाही ‘लाडकी बहीण’ योजनेचे हप्ते घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा १० महिला कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा परिषदेस प्राप्त झाली आहे. त्यांच्याकडून या पैशांची वसुली केली जाणार आहे. नागरी सेवा कायद्यानुसारही त्यांच्यावर कारवाईचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील अपात्र लाडक्या बहिणी

  • २१ ते ६५ पेक्षा वयोगटांतील अपात्र लाभार्थी : १७७४७
  • एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाभार्थी : ७४४९४