शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड दिवसाच्या शाळेने अण्णा भाऊंना दिली आयुष्यभराची शिदोरी, वाटेगावातील शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाकडून कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 18:21 IST

लौकिकार्थाने शिक्षण झाले नसले, तरी त्यांनी अनुभवाच्या शाळेत शेवटपर्यंत धडे गिरवले. साहित्याचे इमलेच्या इमले उभारले, पण त्यांचे वाटेगावातील घर मात्र चंद्रमौळीच राहिले.

सांगली : अवघ्या दीड दिवसाची शाळा शिकलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आयुष्याच्या वाटचालीत कडू-गोड अनुभवांची प्रचंड शिदोरी जमवली. सुख-दु:खाचे धडे गिरवत दुनियादारीची पीएच. डी. मिळवली. त्यांना ‘गमभन’ शिकवणारी वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील प्राथमिक शाळा आता करोडपती बनली आहे. या शाळेला शासनाने १ कोटी ३ हजार ६८० रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून तिचा कायापालट केला जाणार आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापुरुषांशी संबंधित गावांतील शाळा विकसित करण्यासाठी शासनाने राज्यभरात निधी पुरविला आहे. १३ ऐतिहासिक गावांतील शाळा विकसित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये वाटेगावमधील अण्णा भाऊंच्या शाळेचाही समावेश आहे. लौकिकार्थाने शिक्षण झाले नसले, तरी त्यांनी अनुभवाच्या शाळेत शेवटपर्यंत धडे गिरवले. साहित्याचे इमलेच्या इमले उभारले, पण त्यांचे वाटेगावातील घर मात्र चंद्रमौळीच राहिले. ते ज्या शाळेत गेले, ती शाळाही पडक्या भिंतींचीच राहिली.कालांतराने पक्क्या बांधकामाची कौलारू इमारत उभी राहिली, पण अजूनही तिचे जुनाट स्वरूप कायम आहे. शंभर वर्षांहून अधिक जुनी इमारत गळत असल्याने तिच्यावर सिमेंटचे पत्रे घातले आहेत. आता सरकारी निधीतून अण्णा भाऊंची शाळा कात टाकेल. शाळेच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा निश्चित नसला, तरी ती त्यांचे आणखी एक स्मारक ठरणार आहे. गावात त्यांच्या घराशेजारी शासनाने यापूर्वीच स्मारक उभारले आहे. त्यामध्ये शिल्पसृष्टी आहे.सरकारी पेन्शनवर सुनेचा उदरनिर्वाहवाटेगावमध्ये अण्णांच्या स्मारकाशेजारीच त्यांची सून सावित्री राहते. युती शासनाने त्यांच्या नावाने ठेवलेल्या मुदतठेवीचे व्याज आणि निराधार योजनेतून मिळणारे निवृत्तीवेतन यातून त्यांचा चरितार्थ चालतो.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा