शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग यांच्या पुढाकाराने सांगलीच्या सिंचन योजना मार्गी, योगदानाचे स्मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 16:57 IST

राष्ट्रीय जलआयोगाची मान्यता 

प्रताप महाडिककडेगाव : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील टेंभू, ताकारी व म्हैशाळ जलसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे उपसा जलसिंचन योजनांना राष्ट्रीय जल आयोगाने लवकर मान्यता दिली होती. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्याविषयी सांगलीच्या कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून कृतज्ज्ञता व्यक्त होत आहे.१९८४ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांन ताकारी योजनेस व त्यानंतर लगेच म्हैसाळ योजनेस मंजुरी मिळाली. यानंतर शिवसेना-भाजप युतीसरकारने १९९६ मध्ये टेंभू योजनेस मान्यता दिली. या योजनांसाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली. परंतु, केंद्रीय जल आयोगाच्या मान्यते अभावी केंद्र शासनाचा निधी मिळत नव्हता. २००९ मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन मंत्री पतंगराव कदम, आर. आर. पाटील व अनिल बाबर या नेतेमंडळींनी, तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामी, ९ मे २००९ रोजी केंद्रीय जल आयोगाच्या ९८ व्या बैठकीत ताकारी आणि म्हैसाळ योजनांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली.दरम्यान, १ जुलै २००९ रोजी या योजनांना पर्यावरण विभागाची मान्यता आणि १७ डिसेंबर २००९ रोजी नियोजन आयोगाची मान्यता मिळाली. यामुळे केंद्र सरकारच्या एआयबीपी योजनेतून या योजनांना निधी मिळू लागला. याच कालखंडात २०११ मध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेसही केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली. मनमोहन सिंग यांनी दुष्काळी भागातील सिंचन योजनांना चालना देण्यासाठी व मान्यतेसाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे या तिन्ही योजना अंतिम टप्प्यात असून, दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी त्या प्रभावी ठरत आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोठी भूमिका पार पाडली आहे. त्यांच्या काळातच जिल्ह्यातील सिंचन योजनांना जल आयोगासह केंद्र सरकारच्या आवश्यक त्या मान्यता मिळाल्या. याची जाणीव येथील सर्वसामान्य दुष्काळी जनतेला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही सांगलीकर त्यांचे ऋणी राहू. त्यांचे कार्य सांगलीकरांच्या नेहमीच स्मरणात राहील - आमदार विश्वजित कदम  

मनमोहन सिंग यांच्या मंत्रीमंडळात आम्हाला यंग ब्रिगेडला समावून घेण्यात आले. सांगलीच्या दुष्काळी भागातील उपसा सिंचन योजनांना त्यांनी भरघोस निधी दिला होता. देशभरातील कृषी व ग्रामीण विकासाच्या योजनाकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते. तसेच, जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा त्यांनी मिळवून दिला होता. - प्रतिक पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जागतिक बाजारपेठ खुली करताना त्याचा लाभ सर्वसामान्य शेतकरी व मजुरापर्यंत कसा पोहचले. या दूरदृष्टीने विकासाचे व अर्थिक नियोजन केले होते. तसेच, सर्वसामान्य नागरिक, गरीब व गरजू यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आधार कार्ड व युपीआय सारख्या संकल्पनाची अंमलबजावणी सुरू केली होती. - गिरीश चितळे, संचालक, बी. जी. चितळे डेअरी.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीdroughtदुष्काळManmohan Singhडॉ. मनमोहन सिंग