वृद्धसेवाश्रमाच्यावतीने ओमप्रकाश शेटे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:25 IST2021-09-13T04:25:51+5:302021-09-13T04:25:51+5:30

कुपवाड : शहरातील वृद्धसेवाश्रमाच्यावतीने केंद्रीय आरोग्य विभागाचे ओमप्रकाश शेटे यांचा वृद्धसेवाश्रमातील ज्येष्ठ महिला शिवाक्का खोत यांच्या हस्ते नुकताच सत्कार ...

Omprakash Shete felicitated on behalf of Vriddhasevashram | वृद्धसेवाश्रमाच्यावतीने ओमप्रकाश शेटे यांचा सत्कार

वृद्धसेवाश्रमाच्यावतीने ओमप्रकाश शेटे यांचा सत्कार

कुपवाड : शहरातील वृद्धसेवाश्रमाच्यावतीने केंद्रीय आरोग्य विभागाचे ओमप्रकाश शेटे यांचा वृद्धसेवाश्रमातील ज्येष्ठ महिला शिवाक्का खोत यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.

शहरातील वृद्धसेवाश्रमास नुकतीच केंद्रीय आरोग्य विभागाचे ओमप्रकाश शेटे यांनी सदिच्छा भेट दिली. शेटे यांनी यावेळी संस्थेच्या कार्याची माहिती घेतली. यावेळी शेटे म्हणाले की, तरुण पिढीला लोकनेते प्रा. शरद पाटील यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व प्रेरणा देणारे असून ज्येष्ठ नागरिकांसाठी ते करत असलेले काम आदर्शवत असे आहे.

यावेळी पाटील म्हणाले की, ज्या वृद्ध महिलेस गुडघा प्रत्यारोपण करण्यासाठी लागणारी एक लाख रुपयांची मोलाची मदत राज्याचे वैद्यकीय विभागाचे प्रमुख असताना शेटे यांनी दिली होती. त्याच शिवाक्का खोत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार शरद पाटील, आश्रमाचे संचालक अशोक पाटील-कोकळेकर, प्रकाश काळे, सुमित पाटील व आश्रित उपस्थित होते.

फोटो : १२ कुपवाड १

ओळ : कुपवाड वृद्धसेवाश्रमात ज्येष्ठ महिला शिवक्का खोत यांच्या हस्ते केंद्रीय आरोग्य विभागाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. शरद पाटील, अशोक पाटील-कोकळेकर, प्रकाश काळे, सुमित पाटील उपस्थित होते.

Web Title: Omprakash Shete felicitated on behalf of Vriddhasevashram