ओंकारेश्वर शोरूम ग्राहकांसाठी दीपस्तंभ ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:06+5:302021-08-25T04:31:06+5:30
घाटनांद्रे : ग्राहक हाच प्रत्येक व्यवसायाचा राजा असून त्यांच्या पसंतीस उतरून श्री ओंकारेश्वर इलेक्ट्रॉनिक शोरूम हे ग्राहकांसाठी दीपस्तंभ ठरेल, ...

ओंकारेश्वर शोरूम ग्राहकांसाठी दीपस्तंभ ठरेल
घाटनांद्रे : ग्राहक हाच प्रत्येक व्यवसायाचा राजा असून त्यांच्या पसंतीस उतरून श्री ओंकारेश्वर इलेक्ट्रॉनिक शोरूम हे ग्राहकांसाठी दीपस्तंभ ठरेल, असे उद्गार तहसीलदार बी. जी. गोरे यांनी कुची (ता. कवठेमहंकाळ) येथे श्री ओंकारेश्वर इलेक्ट्रॉनिक्स या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी काढले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे उपस्थित होते. या वेळी गोरे पुढे म्हणाले, तरुणांनी नोकरीच्या मागे लागून वेळ दवडण्यापेक्षा व्यवसाय निवडून आपले करिअर करावे. स्वत:बरोबर इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
जितेंद्र शहाणे म्हणाले, रोजगार निर्मिती हाच खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थकारणाचा पाया असून तरुणांनी यावर भर दिला पाहिजे.
युवा नेते संतोष पवार-पाटील, मनसेचे जिल्हा उपप्रमुख धनंजय शिंदे, भारत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. फर्मचे संचालक भारत पाटील यांनी प्रास्ताविक केले. धनंजय शिंदे यांनी आभार मानले.