राष्ट्रपुत्र रनमध्ये मुलांत ओंकार कुंभार, मुलींमध्ये मोहिनी इसापुरे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:32+5:302021-03-30T04:16:32+5:30
आष्टा येथील राष्ट्रपुत्र रनमधील विजेत्याचा सत्कार प्राचार्य डॉ. विलास काळे, सुनील कवठेकर, मनोज फिरंगे, क्रांती फार्णे, प्रा. अक्रम मुजावर, ...

राष्ट्रपुत्र रनमध्ये मुलांत ओंकार कुंभार, मुलींमध्ये मोहिनी इसापुरे प्रथम
आष्टा येथील राष्ट्रपुत्र रनमधील विजेत्याचा सत्कार प्राचार्य डॉ. विलास काळे, सुनील कवठेकर, मनोज फिरंगे, क्रांती फार्णे, प्रा. अक्रम मुजावर, प्रतीक नलवडे, सत्यजित पाटील यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्सच्या क्रीडांगणावर शहीद दिनानिमित्त राष्ट्रपुत्र रन मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेत ओंकार सदानंद कुंभार याने, तर मुलींच्या धावणे स्पर्धेत मोहिनी विजय इसापुरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
सुरुवातीला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा. बी. के. माने, कवी प्रदीप पाटील, मनोज फिरंगे, रोहित हजारे, श्रीकांत काटकर, क्रांती फार्णे यांच्याहस्ते झाले.
मुलांमध्ये तेजस पोवार याने दि्वतीय, आकाश सरगर याने तृतीय, मारुती कांबळे याने उत्तेजनार्थ, तर ओंकार शिसाळे याने ५ वा, सौरभ भानुसे, अनिकेत कोटीवाणी, विवेक मगदूम, राजस निबगरे, तसेच अमोल माने यांनी यश मिळवले.
मुलींच्या स्पर्धेत श्रावणी गोंदकर हिने दि्वतीय, वैष्णवी पवारने तृतीय, तेजश्री ठोकळे हिने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. चैत्राली वडेकर, अर्पिता डवरी, निकिता फडतरे, दिव्या फडतरे, पियुषा जाधव, रोहिणी खिलारे यांनीही यश मिळवले.
राष्ट्रपुत्र रनमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील मुला-मुलींनी सहभाग घेतला. विजेत्यांना आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास काळे, सुनील कवठेकर, मनोज फिरंगे, शरद सव्वाशे, पोलीस निरीक्षक समीर ढोरे, श्रीकांत काटकर, रोहित हजारे व शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अक्रम मुजावर यांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे संयोजन प्रतीक नलवडे, सत्यजित पाटील, वैभव आटुगडे, प्रतीक सिद्ध, स्वप्निल कोळेकर, शांतिसागर खिचडे, आफताब सुतार, भीमराव चव्हाण, अजय केंगार, दिग्विजय नांद्रेकर, आशुतोष जाधव, नीरज कोळी, संकेत पाटील, प्रतीक कापसे, विवेक माळी, अक्षय पाटील, नेहा नायकवडी, अंजली माने यांनी केले.