शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Sangli: गोवा विधानसभेच्या अध्यक्षांमुळे आरग येथील ओम, शिवाच्या डोक्यावर छत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 12:11 IST

शिवा विष्णू पवार आणि त्याचा भाऊ ओम यांच्या आई-वडिलांचा कोरोना साथीमध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून दोघेच छोट्याशा खोलीत राहतात.

सांगली : आरग (ता. मिरज) येथील ओम आणि शिवा या निराधार तरुण भावंडांच्या डोक्यावर हक्काचे छत नाही. ही बातमी गोवा विधानसभेचे अध्यक्ष डॉ. रमेश तवडकर यांच्यापर्यंत पोहोचली. रविवारी (दि.९) ते तडक आरगमध्ये आले. दोघा भावंडांची भेट घेतली. त्यांना हक्काचे घर बांधून देण्याची ग्वाही दिली. तवडकर यांच्या या अनोख्या भेटीने या भावंडांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.शिवा विष्णू पवार आणि त्याचा भाऊ ओम यांच्या आई-वडिलांचा कोरोना साथीमध्ये मृत्यू झाला. तेव्हापासून दोघेच छोट्याशा खोलीत राहतात. मोलमजुरी करून कमावतात आणि स्वत:च स्वयंपाक करून उदरनिर्वाह करतात. त्यांना हक्काचे घर नसल्याची माहिती डॉ. तवडकर यांना त्यांचे मित्र भाजप नेते मोहन वनखंडे यांनी दिली होती. त्यानुसार रविवारी दुपारी डॉ. तवडकर यांच्या वाहनांचा ताफा आरगमध्ये आला. गणपती मंदिराजवळ इंदिरानगरमध्ये वनखंडे, सरपंच सुरेखा नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. वनखंडे यांनी तवडकर यांच्या भेटीची पार्श्वभूमी सांगितली. तवडकर यांनी या भावंडांना श्रमधाम ट्रस्टमार्फत घर बांधून देण्याची ग्वाही दिली.

पवार भावंडांनी शासकीय योजनेतून घरासाठी जिल्हा परिषदेकडे अर्ज केला होता, पण यावर्षीच्या यादीत त्यांचे नाव येऊ शकले नाही. पण, आता श्रमधाममुळे त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. डॉ. तवडकर यांची श्रमधाम संस्था गोव्यात बेघरांना घरे बांधून देण्याचे काम करते. गतवर्षी त्यांनी २० घरे बांधून दिली. यावर्षी १०० घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. लाभार्थ्याला पैसे देण्याऐवजी थेट घरे बांधून देते. आरगमध्ये पवार भावंडांच्या भेटीवेळी त्यांच्या श्रमधाम संस्थेचे स्वयंसेवकही सोबत आले होते.

गोव्याबाहेर पहिलेच घरडॉ. तवडकर म्हणाले, शिक्षणासाठी मी मिरजेत बरीच वर्षे राहण्यास होतो. विद्यार्थिदशेत माझीही आर्थिक परिस्थिती हलाखीची होती, त्यामुळे मला गोरगरिबांच्या परिस्थितीची चांगली जाणीव आहे. याच पार्श्वभूमीवर घरबांधणीचा उपक्रम श्रमधामच्या माध्यमातून राबविला जातो. या कामासाठी लोकांनीही आर्थिक मदत करावी. ज्यांना शक्य नसेल, त्यांनी श्रमदान करावे. या पावसाळ्यानंतर पवार भावंडांना स्वत:चे घर मिळेल. आरग येथील घरकुल गोव्याबाहेरील पहिलेच आहे.

टॅग्स :Sangliसांगलीgoaगोवा