शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मिरजेतील शासकीय दूध डेअरी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर, जुन्या यंत्रांची भंगारात तीन कोटींना विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:04 IST

५५ एकर जागेवर अनेकांचे लक्ष

सदानंद औंधेमिरज : मिरज येथील शासकीय दूध डेअरीमधील जुन्या दूध प्रक्रिया यंत्रणेची २ कोटी ८४ लाख रुपयांना भंगारात विक्री करण्यात आली आहे. बंद असलेली शासकीय दूध योजना पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग होणार असल्याने मिरजची शासकीय दूध डेअरी आता इतिहास ठरणार आहे.मुंबईनंतर राज्यातील सर्वांत मोठी असलेली मिरज येथील शासकीय डेअरी गेल्या पंधरा वर्षांपासून बंद आहे. वर्ष १८५७ मध्ये स्थापन झालेल्या मिरजच्या शासकीय दूध डेअरीत सुमारे दोन लाख लिटर दूध प्रक्रिया करण्याची क्षमता होती. मात्र, कालबाह्य झालेल्या या यंत्रणेचा लिलाव केला असून, २ कोटी ८४ लाख रुपयांत या जुन्या साहित्याची सांगलीतील विशाल स्टील या भंगार व्यावसायिकाला भंगारात विक्री झाली आहे. लिलाव झालेली जुनी यंत्रणा तोडून नेण्याचे काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यात दररोज १५ लाख लिटर दूध उत्पादन होते. मात्र, खासगी आणि सहकारी संस्थांच्या स्पर्धेत टिकू न शकल्यामुळे शासकीय दूध डेअरीचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. डेअरीतील भंगार साहित्य विक्री झाल्यामुळे आता डेअरीची जुनी इमारत व सुमारे ५५ एकर जागा शिल्लक आहे. अनेक वर्षे बंद असल्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली आहे. मिरजसह राज्यातील शासकीय दूध योजना बंद अवस्थेत असल्याने या दूध योजना शिल्लक कर्मचाऱ्यांसह पशुसंवर्धन विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. आता मिरजची शासकीय दूध योजना इतिहासजमा ठरण्याच्या मार्गावर आहे.वॅगनमधून दूध पुरवठामिरज येथील शासकीय दूध डेअरीतून एकेकाळी रेल्वे वॅगनमधून मुंबईला दूध पाठविला जात होता. यासाठी डेअरीपर्यंत रेल्वे रूळ होते. काही काळ मराठवाड्यातील अतिरिक्त दूधही येथे येत होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मराठवाड्यातून येणारा दूध पुरवठा थांबल्यामुळे शासकीय दूध डेअरीचे कामकाज पूर्णपणे बंद झाले आहे.

फक्त ३० कर्मचारीडेअरीतील एकूण ५०० कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना इतरत्र पाठवण्यात आले आहे. आता फक्त ३० कर्मचारी शिल्लक आहेत. दूध योजनेतील कर्मचाऱ्यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे जाण्याचे पर्यायही दिले आहेत.

५५ एकर जागेवर अनेकांचे लक्षमिरज शहरातील शासकीय दूध डेअरीची सुमारे ५५ एकर जागा अनेकांच्या मनात आहे. मात्र, डेअरी बंद झाल्यामुळे या जागेचा शासकीय कार्यालयासाठी वापर करण्याचा प्रस्ताव असू शकतो.