विश्रामबागला अपघातात वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST2021-01-21T04:25:25+5:302021-01-21T04:25:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील सांगली-मिरज मार्गावर असलेल्या विश्रामबागमधील विलिंग्डन महाविद्यालयासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू ...

विश्रामबागला अपघातात वृद्ध ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील सांगली-मिरज मार्गावर असलेल्या विश्रामबागमधील विलिंग्डन महाविद्यालयासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाला. शंकर गणपती चव्हाण (वय ६०, रा. विजयनगर,सांगली) असे त्यांचे नाव असून बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला.
मृत चव्हाण विलिंग्डन महाविद्यालयात प्रयोगशाळा सहायक पदावर होते. ते कुटुंबासह विजयनगर येथे राहण्यास होते. बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ते घरातून सायकल घेऊन निघाले. सांगलीच्या दिशेने येत असताना विलिंग्डन महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची विश्रामबाग पोलिस ठाण्यात नोंद झाली असून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.