आष्टा येथे आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST2021-03-08T04:26:01+5:302021-03-08T04:26:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथे सोमेश्वर मंदिरानजीक उसाला लागलेल्या आगीत एका मेंढपाळासह दोन ...

An old man died in a fire at Ashta | आष्टा येथे आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

आष्टा येथे आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथे सोमेश्वर मंदिरानजीक उसाला लागलेल्या आगीत एका मेंढपाळासह दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. शिवाजी रामचंद्र चव्हाण (६५, रा. आष्टा बाजारवाडी) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

आष्टा येथील सोमेश्वर मंदिरानजीक तलावाच्या समोर इक्बाल इनामदार यांचे शेत आहे. या शेतातील अर्धा एकर उसाला रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान आग लागली. यावेळी शिवाजी चव्हाण हे उसाच्या कडेला आपल्या शेळ्या चारत उभे होते. यावेळी दोन शेळ्या उसात जाऊन चारा खात होत्या. उसाला आग लागल्याने या शेळ्या अडकून पडल्या. त्यांना बाहेर काढण्यासाठी शिवाजी चव्हाण उसात गेले. याच दरम्यान आगीने रौद्ररूप धारण केले. यात चव्हाण यांना बाहेर पडता न आल्याने शेळ्यांसह त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी चव्हाण यांच्या पश्‍चात मुलगा, सून व नातू असा परिवार आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते, नूर मुजावर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते अंकुश मदने आदींनी भेट दिली.

Web Title: An old man died in a fire at Ashta